महाराष्ट्र आर्य वैश्यमहासभा या संस्थेने नांदेड येथे एक भव्य असे “वासवी माता परमेश्वरी भवन’’ हे सभागृह निर्माण केलेले आहे. या सभागृहासाठी दि. 20 एप्रिल 2000 रोजी नांदेड येथे सिडको कार्यालयाकडून 3,300 चौ. मी. (35,500 चौ. फु) चा भुखंड महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला ताब्यात देण्यात आला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषराव शेटे हे होते. वासवी माता परमेश्वरी भवनाच्या बांधकामाच्या भूमीपूजन कार्यक्रम दि. 9 सप्टेंबर 2011 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेत व गुरुवर्य श्री एकनाथ महाराज कंधारकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. वासवी माता परमेश्वरी भवनाचे बांधकाम दि. 31/5/2017 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांच्या अथक परिश्रमाने पुर्णत्वास आले व दि. 1/6/2017 रोजी वासवी माता परमेश्वरी भवनाचा उद्घाटन सोहळा ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , वित्त, नियोजन व वन मंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते व श्री रोशैय्या साहेब माजी राज्यपाल तसेच मा. श्री अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वासवी माता परमेश्वरी भवनाचे 36000 चौ. फु. बांधकाम झालेले असून त्यात सभागृह, भोजन कक्ष, पाकगृह, व निवासासाठी 15 खोल्यांच्या समावेश आहे. आज याच भवनाच्या परिसरात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे मुख्य कार्यालय आहे. भवनाला लागूनच 20000 चौ. फुटांची मोकळी जागा असून त्याचा वापर वाहन तळ म्हणून करण्यात येतो. वासवी माता परमेश्वरी भवनाचे बांधकाम आर्य वैश्य समाजातील समाज बांधवांनी दिलेल्या देणगीतून पूर्ण करण्यात आलेले आहे. समाज बांधवांच्या सहयोगातून या भवनाची निर्मीत करण्यात आलेली आहे.
वासवी माता परमेश्वरी भवन, नांदेड
- posted by Admin |
- 12-03-2020