सुस्वागतम्,

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा

महाराष्ट्रात आर्य वैश्य समाज हा कोमटी, आर्य वैश्य, वैश्य कोमटी या नावाने ओळखला जातो. आर्य वैश्य (कोमटी) समाज बांधवांचा मुख्य व्यवसाय हा विविध प्रकारचा व्यापार करणे हा आहे. व्यापारानिमीत्त आर्य वैश्य समाज बांधव महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आर्य वैश्य समाज हा विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे सर्व समाज बांधवांना सामाजिकदृष्ट्या संघटित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची स्थापना दि. 4 ऑगस्ट 1982 रोजी करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाजाची सामाजिक संस्था (ट्रस्ट) आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेचे मुख्यालय नांदेड येथे आहे.

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची स्थापना ही आर्य वैश्य समाजातील सर्व बांधवांचे सामाजिक संघटन करून त्यातूनच समाजातील सर्वसामान्य घटकांचा वैयक्तिक, कौटुंबीक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक विकास साधण्यासाठी समाजातील काही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रतिष्ठीत मंडळींनी एकत्र येऊन समाज कल्याणासाठी केलेली आहे.

समाजातील प्रत्येक घटक त्याचा केंद्रबिंदू व्यक्ती व कुटूंब ठेवून व्यक्तीविकासातून कौटुंबिक विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास व पर्यायाने राष्ट्राचा विकास साधण्याचा हाच केवळ मूळ हेतू ठेऊन आजपर्यंत ही संस्था कार्यरत आहे.

आर्य वैश्य समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्था ही नेहमी कार्यरत असते. त्यासाठी संस्थेकडून वेळोवेळी विविध योजना, परियोजना, कार्यक्रम, शैक्षणिक मदत, आर्थिक मदत, वैवाहिक सहायता, वधू-वर परिचय मेळावे व धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन केले जाते. तसेच समाजात आपत्कालिन परिस्थितीमध्ये या संस्थेमार्फत वेळोवेळी मदत करण्यात येते.



1982 पासून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा या संस्थेस खालील प्रमाणे अध्यक्ष लाभलेले आहेत.
  • डॉ. श्री. रमाकांत सांभराव मामीडवार
  • श्री. नारायण पांडुरंग चन्नावार
  • श्री. सुभाष सांभ शेटे
  • डॉ. श्री डी. आर. मुखेडकर
  • श्री. एकनाथ बाळकृष्ण मामडे
  • श्री. नंदकुमार दत्तात्रय गादेवार